घातला दुकान देती आली अशी दान ।संत उदार उदार भरले अनंत भंडार ।माग त्यासी पुरे धनी अनेकांशी उरे ।तुका...
घातला दुकान देती आली अशी दान ।संत उदार उदार भरले अनंत भंडार ।माग त्यासी पुरे धनी अनेकांशी उरे ।तुका म्हणे पोते देवे भरले नोहे रिते ।। एल.बी. अॅग्रो अॅण्ड बायो फर्टिलायझर या कंपनीची मुहूर्तमेढ सन २०१२ मध्ये झाली आहे. म्हणायला इतर फर्टिलायझर कंपनी सारखी ही वाटू शकते. मात्र इतर कंपन्यांमध्ये आमच्यामध्ये फरक आहे की, ही कंपनी शेतकरी हितासाठी स्थापन करण्यात आली आहे. आम्ही शेतकरी हित जोपासतो, असे सर्वच सांगतात. मात्र उत्पादनांच्या किंमती बघितल्या तर प्रत्यक्षात दिसे काहीही दिसत नाही. याचे उदाहरण द्यायचे झाल्यास मेडिकलवर एखादे औषध जर २०० रुपयांना मिळत असेल आणि तेच औषध जनरीक मेडिकलवर २० रुपयाला मिळत असेल तर एवढा मोठा फरक फरक येतो कोठून? हेच सूत्र आम्हीही राबवित आहोत. एल.बी. अॅग्रोची उत्पादने ही अत्यंत कमी किंमतीत म्हणजे बाजारभावापेक्षा अगदी निम्म्या किंमत आम्ही शेतक-यांना उपलब्ध करुन देत असतो. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे त्यातूनही आम्ही योग्य तो नफा कमवित असतो. आम्हालाही इतरांप्रमाणे योग्य तो नफा कमविता आला असता. मात्र तसे न करता आम्ही शेतकरी हिताला प्राधान्य देतो. कारण या कंपनीची मूळातच स्थापना त्या उद्देशाने झाली आहे. गत ८ वर्षात एकूण ८ दर्जेदार, गुणवत्तापूर्ण उत्पादने घेऊन आम्ही हजारो शेतक-यांपर्यंत प्रत्यक्ष पोहचलेलो आहोत. आमच्या उत्पादनांपासून शेतक-यांना लाभ देखील झालेला आहे. हजारो शेतकरी समाधानी असून तसे अभिप्राय त्यांनी आमच्याकडे नोंदविले आहेत. सोबतच आमच्या युट्युब चॅनलवर अनेक शेतक-यांच्या मुलाखती देखील आम्ही प्रसिद्ध केलेल्या आहेत. त्या देखील तुम्ही या अॅपच्या माध्यमातून बघु शकता. एल.बी. किसान अॅग्रो या अॅपच्या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त शेतक-यांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करीत आहोत. हे अॅप शेतकरी बंधू - भगिनींसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. कारण या अॅपमध्ये शेतीचे क्षेत्रफळ मोजणे, वेगवेगळ्या पिकांना वेळोवेळी कोणते डोस द्यावे, खतांचं कॅलक्युलेटर, हवामानाचा अचूक अंदाज आदी विविध गोष्टींचे मार्गदर्शन प्राप्त होणार आहे. सोबतच हे अॅप म्हणजे शेतकरी बुंध - भगिनींसाठी हक्काचं मार्केट देखील असणार आहे. फक्त आमचीच उत्पादने नव्हे इतरही कंपन्यांची विविध उत्पादने या अॅपवर विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे इतर कंपन्यांची उत्पादने देखील बाजारभावापेक्षा कमी किंमतीत उपलब्ध करुन देण्याचा आमचा प्रयत्न राहिल. ज्यातून शेतक-यांची बचत होऊन उत्पादन खर्च कमी होण्यास हातभार लागू शकेल. पुढे कालांतराने शेतीसाठी जेही उत्पादने, अवजारे लागतात ते सर्व या अॅपवर उपलब्ध करुन देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. तेही बाजारभावापेक्षा कमी किंमतीत! सोबतच या अॅपच्या माध्यमातून शेतकरी बुंध - भगिनींच्या साख्यात थेट पैसे जमा करणारी जी योजना आम्ही राबवित आहोत ती तर न भूतो न भविष्यती अशी आहे. आजपर्यंत अशी योजना कोणीही राबविलेली नाही आणि सर्वदूर मोठ्या प्रमाणात फोफावत असलेली स्वार्थी प्रवृत्ती पाहता भविष्यातही कोणी राबवेल, हे सांगता येत नाही. मात्र आपण भारतीय लोक अनुकरणीय आहोत. संतांची फार मोठी परंपरा आपल्याकडे आहे. त्यामुळे भविष्यात या योजनेचे अनुकरण करुन आमच्याप्रमाणेच शेतकरी हिताचा विचार इतर कंपन्यांही करुन लागल्या, तर या गोष्टीचा आम्हाला आनंदच होईल. थोडक्यात शेतकरी बुंध - भगिनींना समृद्ध बनविणे, त्याला पैसा प्राप्त करुन देणे व सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे त्याला सन्मान प्राप्त करुन देणे हे उदात्त ध्येय घेऊन आम्ही वाटचाल करीत आहोत. फक्त महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील शेतकरी बांधवांना यातून जोडण्याचे काम केले जाणार आहे. शेत करा रे फुकाचे । नाम विठोबा रायाचे ।।